आग्रहाखातर नाव घेते, आशीर्वाद द्यावा
__ रावांचा सहवास आयुष्यभर लाभावा !!
आशेच्या रंगमंचावर स्वप्नांचे पडसाद ,
………चे नाव घेते तुम्हा सर्वांचा आशीर्वाद !
दौलत होति तुळस माहेरच्या अंगणात ….
साथि फुलेल आता सासरच्या व्रुन्दवनात् !!
मोगऱ्याचा सुगंध, पावसाळ्यातील मृदगंध
….शी जुळले आता, रेशमी ऋणानुबंध !!
आईने दिले वळण वडिलांनी दिले शिक्षण,
…….. रावांचे नाव घेते हेच मा़झे भुषण!!
आई – वडिलांचे प्रेम हा माहेरचा आहेर,
…….. रावांसाठी जोडले सासर नी माहेर!!