मोगऱ्याच्या फुलाला सुगंध सुवास,
…. रावांना भरवते जिलेबीचा घास.
मंगळसुत्राच्या दोन वाट्या सासर आणी माहेर,
…. यांनी केला मला सौभाग्याचा आहेर.
सासरच्या घरी छान आहे अंगण,.
….. रावांचे नाव घेते सोडते मी कंकण.
नाव घ्या नाव घ्या म्हणता, नाव तरी काय घ्यायचे, …….रावांना शेवटी अहोच म्हणायचे.
अवघड आहे म्हणतात महाबळेश्वर चा घाट
…. शी बांधली लग्नाची गाठ.
सोन्याच ठेवला ताट त्याभोवती रांगोळी काढली पोरींनी ,
—– रावांच नाव ऐकायला
गर्दी केली पाहुण्यांची.
मैत्रिणींमुळे माझ्या जुळून आला आमचा सूत्र,
……….चे नाव घेऊन आयुष्याचे सुरु झाले नवे सत्र.
हळदीची मेहंदी देते आयुष्याला अर्थ नवा,
….चा सहवास मला आयुष्यभर हवा..!